वाशिम - मालेगाव येथील छोटे हॉटेल व्यावसायिक असलेले दिलीप घुगे व त्यांची पत्नी सुनंदा दिलीप घुगे यांना 'दि अकोला जिल्हा मध्यवर्ती बँके'च्या मालेगाव शाखेने लखपती दाखविले आहे. त्यांच्या संयुक्त खात्यात बँकेने तब्बल 3 लाख रुपये जमा केले. एवढेच नाही, तर याशिवाय शेती नसतानाही त्यांच्या खात्यात गारपीट नुकसानीचे 9 हजार रुपयेही जमा झाल्याचे दिसते.
बँकेचा अजब कारभार; खात्यावर एक हजार रूपयेही नसलेल्या खातेदाराला केले 'लखपती' - imran khan
बँकेच्या गलथान कारभारामुळे एक हजार रूपयेही नसलेल्या खातेदाराच्या खात्यात तीन लाख रूपये ऐन नोटाबंदीच्या काळात जमा झाले आणि परस्पर काढण्यातही आले.
दिलीप घुगे यांनी गॅस सबसिडीसाठी दि अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मालेगाव शाखेत खाते उघडले. सबसिडीचे पैसे जमा झाले का? हे पाहण्यासाठी ते बँकेत गेले. त्यांनी पासबुक देऊन पासबुकवर नोंदी करून घेतल्या. यानंतर घरी जाऊन पासबूक पाहिल्यानंतर तर त्यांना धक्काच बसला. 2017 च्या नोटाबंदी काळात त्यांच्या खात्यावर चक्क तीन लाख रुपये जमा झाले होते. असे त्यांच्या निदर्शनास आले. मात्र, आपल्या खात्याची प्रत्यक्षात तपासणी केली, तेव्हा त्यात हजार रूपयांपेक्षाही कमी पैसे असल्याचे त्यांना दिसून आले.