वाशिम- विना अनुदानित शाळा आणि महाविद्यालयातील शिक्षकांचे मुंबई येथे धरणे आंदोलन सुरू आहे. त्यांच्या समर्थनार्थ अमरावती विभागीय शिक्षक संघ तसेच संस्थाचालकांतर्फे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना काम बंद करण्याचे आवाहन करण्यात आले होते. अनुदान देण्यासह अन्य प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आणि ईतर कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले आले.
मुंबईत आंदोलन करणाऱ्या शिक्षकांच्या समर्थनार्थ काळ्या फिती लावून निषेध - weducation
विना अनुदानित शाळा आणि महाविद्यालयातील शिक्षकांचे मुंबई येथे धरणे आंदोलन सुरू आहे. त्यांच्या समर्थनार्थ अमरावती विभागीय शिक्षक संघ तसेच संस्थाचालकांतर्फे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना काम बंद करण्याचे आवाहन करण्यात आले होते. अनुदान देण्यासह अन्य प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आणि ईतर कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले आले.
मुंबईत आंदोलन करणाऱ्या शिक्षकांच्या समर्थनार्थ काळ्या फिती लावून निषेध
रिसोड, मालेगाव, कारंजा, वाशिम, मंगरूळपीर, मानोरा तालुक्यांतील बहुतांश शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी कामबंद ठेवत आंदोलन केले. दरम्यान, २६ ऑगस्ट रोजी मुंबई येथे आंदोलन करणाऱ्या शिक्षकांवर पोलिसांनी लाठीमार केला होता. या घटनेचा या वेळी काळ्या फिती लावून निषेध करण्यात आला.