वाशिम- जिल्ह्यातील पांगरी नवघरे येथील अंगणवाडीच्या सेविका शोभा नंदकिशोर नवघरे यांनी कोरोनावर आधारित एक गीत तयार केले आहे. 'कोरोना नावाचा राक्षस आला रे आणि सगळे मिळून पळवून लावू या त्याला रे' या आपल्या गीतातून त्यांनी लोकांमध्ये जनजागृती केली आहे.
'कोरोना नावाचा राक्षस आला रे', गाण्यातून अंगणवाडी सेविकेची जनजागृती - गाण्यातून अंगणवाडी सेविकेची जनजागृती
पांगरी नवघरे येथील अंगणवाडीच्या सेविका शोभा नंदकिशोर नवघरे यांनी कोरोनावर आधारित एक गीत तयार केले आहे. 'कोरोना नावाचा राक्षस आला रे आणि सगळे मिळून पळवून लावू या त्याला रे' या आपल्या गीतातून त्यांनी लोकांमध्ये जनजागृती केली आहे.
अंगणवाडी सेविका शोभा नंदकिशोर नवघरे
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. त्यामुळे यामध्ये आपलेही योगदान असावे, या उद्देशाने त्यांनी हे गीत तयार केले आहे. या माध्यातून त्यांनी लोकांना कोरोनापासून वाचण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करत सुरक्षित राहण्याचा संदेश दिला आहे .