शेतकऱ्यांना कर्जाच्या नोटीसा पाठवल्याने स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचे 'आरती' आंदोलन - रिसोड
कर्ज वसुलीसाठी बँका नोटीस देत असल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि संतप्त शेतकऱ्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया येथे मुख्यमंत्र्यांच्या फोटोसमोर नोटीस जाळून आरती केली
नोटीस जाळताना स्वाभिमानीचे कार्यकर्ते
वाशिम- रिसोड तालुका दुष्काळग्रस्त आहे. मात्र, तरीही शेतकऱ्यांना कर्जाच्या नोटीस पाठवण्यात येत आहेत. त्यामुळे संतप्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बँकेत मुख्यमंत्र्याच्या फोटोसमोर नोटीस जाळून आरती केली.
कमी पावसामुळे रिसोड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आला आहे. मात्र, कर्ज वसुलीसाठी बँका नोटीस देत असल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि संतप्त शेतकऱ्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया येथे मुख्यमंत्र्यांच्या फोटोसमोर नोटीस जाळून आरती केली आणि निषेध व्यक्त केला. यापुढेही अशी पठाणी वसुली सुरू ठेवली तर बँकेच्या मॅनेजरला काळे फासून आंदोलन करणार असल्याचे आंदोलन कर्त्यांनी सांगितले आहे.