वाशिम - वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे फाशी घेत असताना दोरी तुटल्याने एकाचा जीव वाचला आहे. जिल्ह्यातील कारंजा येथील विठ्ठल इंगोले यांनी आजाराला कंटाळून झाडावर चढून फाशी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र दोरी तुटल्याने त्यांचा जीव वाचला आहे.
'देव तारी त्याला कोण मारी', फाशी घेताना दोरी तुटल्याने वाचला जीव... - कारंजा
आजाराला कंटाळून फाशी घेताना दोरी तुटल्याने एका व्यक्तीचा जीव वाचलाय. त्यामुळे 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय कारंजा येथील लोकांना आलाय.
फाशी घेतांना दोरी तुटल्याने वाचला जीव
विठ्ठल इंगोले यांनी गंभीर आजाराला कंटाळून झाडावर चढून फाशी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने दोरी तुटल्याने ते खाली पडलेले. त्यानंतर 'सर्वधर्म आपत्कालीन बचाव पथकाने' घटनास्थळी जाऊन त्यांना रुग्णालयात दाखल केले आणि त्यांचा जीव वाचला. त्यामुळे पुन्हा एकदा 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय वाशिमकरांना आला आहे.