वाशिम - दिग्रसवरुन पुण्याकडे जात असलेल्या ट्रॅव्हल्स बसमधून मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास अचानक धूर येऊ लागल्याची घटना घडली. यामुळे प्रवाशांची धावपळ उडाली.
वाशिममध्ये अकोला फाट्याजवळ ट्रॅव्हल्स बसमधून धूर निघाल्याने प्रवाशांची धावपळ - अकोला फाटा
मालेगाव येथील अकोला फाट्यावरील पेट्रोल पंपासमोर मंगळवारी रात्री साडेदहा वाजता ट्रॅव्हल्समधून अचानक धूर आला. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
ट्रॅव्हल्स बसमधून धूर येताना
मालेगाव येथील अकोला फाट्यावरील पेट्रोल पंपासमोर मंगळवारी रात्री साडेदहा वाजता ट्रॅव्हल्समधून अचानक धूर आला. यामुळे प्रवाशांची धावपळ झाली. ही ट्रॅव्हल्स पेट्रोल पंपासमोर थांबल्याने परिसरातील नागरिकांमध्येही काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, चालकाने ही ट्रॅव्हल्स पेट्रोल पंपापासून दूर नेऊन थांबवली. काही वेळाने या बसमधील धूर बंद झाल्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला.