वाशिम -जिल्ह्यात शुक्रवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे मंगरूळपीर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकऱ्यांचा सोयाबीन पूर्णपणे भिजला आहे. त्यामुळे बाजार समितीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
वाशिममध्ये जोरदार पाऊस, सोयाबीन भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान
बाजार समितीच्या ओट्यावर व्यापाऱ्यांचा माल पडलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा माल उघड्यावर टाकावा लागत आहे. त्यातच शुक्रवारी रात्री परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेकडो क्विंटल सोयाबीन भिजला आहे.
वाशिममध्ये जोरदार पाऊस
बाजार समितीच्या ओट्यावर व्यापाऱ्यांचा माल पडलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा माल उघड्यावर टाकावा लागत आहे. त्यातच शुक्रवारी रात्री परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेकडो क्विंटल सोयाबीन भिजला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.