महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतकऱ्यांसाठी खूशखबर..! महामंडळाकडून घेतलेले कर्ज लवकरच माफ होणार - loan waiver in washim

शेतकऱ्यांनी महामंडळाकडून घेतलेले कर्ज लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन माफ करणार असल्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

By

Published : Jan 20, 2020, 7:33 PM IST

वाशिम- विदर्भ आणि मराठवाड्यात मागील काही वर्षांपासून दुष्काळ पडत आहे. महामंडळातून शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज माफ करण्यासाठी मी पुढाकार घेणार आहे. लवकरच यावर निर्णय घेऊन महामंडळाकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांचे कर्जमाफ करणार असल्याचे मत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी वाशिममध्ये बोलताना व्यक्त केले.

बोलताना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

समाज कल्याण विभागाच्या आढावा बैठकीसाठी आले असता ते बोलत होते. त्याचबरोबर समाज कल्याण विभागातून प्रत्येक घटकांना मिळणारा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांना मिळावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी बोलताना मंत्री मुंडे यांनी सांगितले.

हेही वाचा - जवान तस्लीम मुन्नीवाले यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ABOUT THE AUTHOR

...view details