वाशिम- जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील मोहगव्हान येथील गौरक्षण सेवा समितीमध्ये अचानक नाग निघाल्याने एकच खळबळ उडाली. याची माहिती सर्पमित्र गौरवकुमार ईंगळे यांना मिळाल्यावर त्यांनी या नागाला यशस्वीरित्या पकडून जीवनदान दिले.
वाशिममध्ये सर्पमित्राकडून नागाला जीवदान - साप
वाशिममधील मंगरुळपीर तालुक्यातील मोहगव्हान येथील गौरक्षण सेवा समितीमध्ये शनिवारी संध्याकाळच्या सुमारास एक साप आढळून आला. याची माहिती सर्पमित्र गौरवकुमार ईंगळे यांना मिळाल्यावर त्यांनी या नागाला यशस्वीरित्या पकडून जीवनदान दिले.
वाशिममध्ये सर्पमित्राकडून नागाला जीवदान
पावसाळा सुरू असल्याने अनेक ठिकाणी साप बाहेर निघत आहेत. तर मंगरुळपीर तालुक्यातील मोहगव्हान येथील गौरक्षण सेवा समितीमध्येही शनिवारी संध्याकाळच्या सुमारास एक साप आढळून आला. त्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती मानद वन्यजीव रक्षक गौरवकुमार ईंगळे यांना दिली असता सर्पमीत्र ईंगळे हे त्वरीत घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी ४ फूट नागाला यशस्वीरीत्या पकडून त्याला मंगरूळपीर येथील वनक्षेत्रात नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
Last Updated : Aug 4, 2019, 11:18 PM IST