महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

इनोव्हा कार मधून 100 किलो गांजा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

कारंज्याकडून शेलुबाजारकडे जाणाऱ्या इनोवा कारमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा जात असल्याचे पोलिसांना समजले होते. त्याआधारे स्थानिक गुन्हे शाखेचे चे पोलीस निरीक्षक शिवा ठाकरे यांनी सापळा रचून इनोव्हा कार पकडली.

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

By

Published : Nov 3, 2019, 11:25 AM IST

Updated : Nov 3, 2019, 12:18 PM IST

वाशिम -कारंजा शेलुबाजार मार्गावर आज स्थानिक गुन्हे शाखेचे वाशिम यांच्या पथकाने ग्रे रंगाच्या इनोव्हा कार मधून लाखो रुपये किमतीचा 100 किलो 350 ग्रॅम गांजा जप्त केला आहे.

स्थानिक गुन्हे शाखा वाशिमला याविषयी माहिती मिळाली होती. कारंज्याकडून शेलुबाजारकडे जाणाऱ्या इनोवा कार क्रमांक एम एच 03 बी जे 7406 मध्ये मोठ्या प्रमाणात गांजा जात असल्याचे पोलिसांना समजले होते. त्याआधारे स्थानिक गुन्हे शाखेचे चे पोलीस निरीक्षक शिवा ठाकरे यांनी सापळा रचून इनोव्हा कार पकडली.

इनोव्हा कार मधून 100 किलो गांजा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

या कारमधून स्थानिक गुन्हे शाखेने 100 किलो 350 ग्रॅम गांजा जप्त केला. आरोपी आशुतोष कैलाश गायकवाड (वय २०, खासगी नोकरी), विजय राजेंद्र शिंदे (वय २७, नोकरी), प्रितेश बाळासाहेब शिंदे (वय २१), यश दिनकर पवार (वय २२, खासगी बॉडीगार्ड, रा. जातेगाव (बु)), ज्ञानेश्वर बाळासाहेब शिंदे (वय २०), महेश प्रकाश पराई (वय २२) यांच्याविरुद्ध पोस्टे कारंजा शहर येथे अंमली औषधीद्रव्ये व मन: प्रभावी पदार्थ अधिनियम १९८५ च्या कलम २० व २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी पवार वगळता सर्वजण पुण्यातील शिरूर तालुक्यातील मुखई येथील रहिवासी आहेत.

हेही वाचा -

Last Updated : Nov 3, 2019, 12:18 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details