महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाशिम : रिठद येथे भीषण आग, सहा घरे जळून खाक - आग

रिठद येथील माधव आरु यांच्या घराला मध्यरात्रीच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीने रुद्ररूप धारण केले होते. या आगीत शेजारील सहा घरे जळून खाक झाली आहेत.

भीषण आगीत सहा घरे जळून खाक झाली आहेत.

By

Published : Apr 8, 2019, 8:43 AM IST

वाशिम -जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील रिठद गावात मध्यरात्रीच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या आगीत सहा घरे जळून खाक झाली आहेत. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, एकूण २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.

रिठद येथे भीषण आगीत सहा घरे जळून खाक झाली आहेत.

रिठद येथील माधव आरु यांच्या घराला मध्यरात्रीच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीने रुद्ररूप धारण केले होते. या आगीत शेजारील सहा घरे जळून खाक झाली आहेत. घरातील सोयाबीन, हरबयासह ५५ हजारांची रोकड जळून खाक झाली.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहचून आग विझवली. मात्र, तोपर्यंत घरे जळून खाक झाली होती. या घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र, एकूण २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details