वाशिम -मालेगाव तालुक्यातील शिरपूर हे गाव मैत्रीच्या अतूट नात्याची जपवणूक करणारे एक आदर्श गाव म्हणून ओळखले जाते. याचे कारण ४०० वर्षांपूर्वी होवून गेलेल्या मिर्झामिया व जानगीरबाबा या दोन भिन्न संप्रदायातील संताच्या मैत्रीतून मिळालेल्या बंधूभावाच्या वारसाची जपवणूक या गावातील लोक करत आहेत.
दोन भिन्न संप्रदायातील संताच्या मैत्रीचा वारसा जपणारे आदर्श शिरपूर गाव - जैन धर्म वाशिम
वाशिम जिल्ह्यातील शिरपूर हे गाव मैत्रीच्या अतूट नात्याची जपवणूक करणारे एक आदर्श गाव म्हणून ओळखल आहे. ४०० वर्षापासून मिर्झामिया व जानगीर बाबा या संताच्या मैत्रीतून सामाजिक सद्भावनेचा संदेश देण्यात येत आहे. आज हि या अमूल्य ठेव्याची जोपासना येथील ग्रामस्थ करत आहेत.
अनेक वर्षांपूर्वी हिंदू व मुस्लीम धर्मियांच्या या दोन संतामधील असलेल्या बंधुभावाची प्राणपणाने जपवणूक करणारे वाशिम जिल्ह्यातील शिरपूर-जैन हे गाव सामाजिक सलोख्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. आजही येथील जानगीरबाबाच्या वार्षिक पालखी उत्सवाची सुरुवात मिर्झामियांच्या दर्ग्याला विधिवत चादर चढवून नैवेद्य दिल्याशिवाय होत नाही, तर मिर्झामियांचा उरूस शरीफही जानगीरबाबाच्या पूजनानंतरच साजरा केला जातो.
वाशिम जिल्ह्यातील शिरपूर हे गाव जैन धर्मियाची काशी म्हणून ओळखले जाते. सुमारे ४०० वर्षांपूर्वी होवून गेलेल्या मिर्झामिया व जानगीरबाबा यांच्यातील अतूट मैत्रीने दोन्ही समाजाच्या अनुयायांना बंधुभावाची शिकवण दिली. मिर्झामियाच्या दर्ग्यावर फडकणारे दोन्ही ध्वज त्यांच्यातील मैत्रीचे प्रतिक असून सामाजिक कटुता सर्वांकरिता घातक असल्याचा संदेशही यामधून दिला जात आहे.