वाशिम -दीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर १ डिसेंबरपासून (आज) इयत्ता पहिली ते चवथीच्या शाळेची ( Washim School Reopen ) पहिली घंटा वाजली आहे. चिमुकल्या विद्यार्थ्यांचे शाळा प्रशासन, शिक्षकांनी स्वागत केले आहे. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.
Washim School Reopen : शहरी व ग्रामीण भागातील पहिली ते चवथीच्या शाळा उत्साहात सुरू - कोरोनानंतर महाराष्ट्रातील शाळा सुरु
इयत्ता पहिली ते चवथीच्या शाळेची ( Washim School Reopen ) पहिली घंटा वाजली आहे. चिमुकल्या विद्यार्थ्यांचे शाळा प्रशासन, शिक्षकांनी स्वागत केले आहे. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.
कोरोनामुळे गत दीड वर्षांपासून शिक्षण क्षेत्र प्रभावित झाले. पहिली लाट ओसरल्यानंतर गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले होते. त्यानंतर जानेवारी २०२१ पासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होत नाही, तोच कोरोनाची दुसरी लाट आली आणि शाळा पुन्हा बंद झाल्या. यंदा कोरोनामुक्त असलेल्या ग्रामीण भागात २५ जुलैपासून आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. त्यानंतर कोरोना नियंत्रणात असल्याने शहरी व ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीचे वर्ग ४ ऑक्टोंबरपासून सुरू करण्यात आले. मात्र, गत दीड वर्षांपासून पहिली ते चवथीचे वर्ग बंदच होते. जिल्ह्यात एकूण १३५० शाळा असून यापैकी ३५० प्राथमिक शाळा आहेत. कोरोना नियंत्रणात असल्याने आणि राज्य शासनाकडून हिरवी झेंडी मिळाल्याने आज १ डिसेंबरपासून ग्रामीण भागात पहिली ते चवथी आणि शहरी भागात पहिली ते सातवीच्या शाळा उत्साहात सुरू झाले आहे. त्यानुसार शिक्षण विभागाने पूर्वतयारी केली होती. पहिली ते चौथीच्या एकूण शाळा ३५०, पहिली ते चौथीचे एकूण विद्यार्थी ८०७६३.