महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रस्ते दुरुस्तीसाठी ऑटो युनियनचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन

वाशिम नाका ते क्लुशा बाबा दर्गा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. लवकरात लवकर रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू केले नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा रिक्षा चालकांनी दिला.

Auto Union
निवेदन देताना रिक्षा चालक

By

Published : Mar 3, 2020, 7:41 AM IST

वाशिम -रिसोड शहरातील रस्त्यांची अवस्था वाईट झाली आहे. वाशिम नाका ते क्लुशा बाबा दर्गा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या संदर्भात वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने शहरातील साईलीला ऑटो युनियनने सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले आहे.

ऑटो युनियनचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन

हेही वाचा -अहमदनगर पीडिता आणि पतीला जीवे मारण्याचा प्रयत्न, दोन अज्ञात पोलिसांसह दहा जणांवर गुन्हा दाखल

शहरातील खराब रस्त्यांमुळे वाहनचालक आणि प्रवासी दोघांनाही त्रास होत आहे. यामुळे अनेक अपघातही झाले आहेत. लवकरात लवकर रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू केले नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा रिक्षा चालकांनी दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details