वाशिम- कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात नागरिकांकडून संचारबंदीचे उल्लंघन होऊ नये, कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलीस यंत्रणा जीवाची पर्वा न करता अहोरात्र प्रयत्न करत आहे. त्यामुळे, पोलिसांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी जाऊन जेवण आणि नाश्त्याचे वाटप करण्यात आले.
वाशिममध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पोलिसांना दिले जेवण - rss gave food to police washim
दुसऱ्यांच्या मदतीसाठी दिवस-रात्र काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना देखील कोरोनापासून जीवाला धोका आहे. मात्र, जीव मुठीत धरून ते आपले कर्तव्य बजावत आहे. त्यामुळे, पोलिसांच्या कौतुकास्पद कार्याची दखल घेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पोलिसांना अल्पोहार आणि जेवणाची सोय करून देण्यात आली.
संचारबंदी लागू झाली तेव्हापासून शहरात बऱ्याच प्रमाणात शुकशुकाट पहायाला मिळत आहे. अत्यावश्यक सुविधांची दुकाने सोडून इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहे. शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलिसांकडून अहोरात्र प्रयत्न केले जात आहे. दुसऱ्यांच्या मदतीसाठी दिवस रात्र काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना देखील कोरोनापासून जीवाला धोका आहे. मात्र, जीव मुठीत धरून ते आपले कर्तव्य बजावत आहे. त्यामुळे, पोलिसांच्या कौतुकास्पद कार्याची दखल घेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पोलिसांना जेवण आणि नाश्त्याचे वाटप केले.
हेही वाचा-संचारबंदीत आयडीयाची कल्पना; गावाकडे जाण्यासाठी चक्क अँम्बुलन्सचा वापर, पोलिसांनी केला 'भांडाफोड'