वाशिम - जिल्ह्यातील किन्हीराजा येथील दी अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर दरोडा टाकल्याची घटना घडली. यामध्ये चोरांनी तिजोरीसह १४ लाख ९१ हजार रुपायांची रक्कम लंपास केली आहे.
अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर दरोडा, १४ लाख ९१ हजारांचा मुद्देमाल लंपास - chori
जिल्ह्यातील किन्हीराजा येथील दी अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर दरोडा टाकल्याची घटना घडली. यामध्ये चोरांनी तिजोरीसह १४ लाख ९१ हजार रुपायांची रक्कम लंपास केली आहे.
दी अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर दरोडा
शुक्रवारी मध्यरात्री चोरीची घटना घडली. यामध्ये चोरांनी तिजोरीसह १४ लाख ९१ हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. जऊळका पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या किन्हीराजा येथील शिव चौकात असलेल्या बँकेत सध्या पीक कर्जाचे वाटप सुरू आहे. त्यामुळे बँकेत मोठ्या प्रमाणात रोकड असल्याने रात्री अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकून रोख रक्कमेसह तिजोरी चोरून नेल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच जऊळका पोलीस स्टेशनचे पोलीस ताफ्यासह दाखल झाले असून, पुढील कार्यवाही करीत आहेत.
Last Updated : May 4, 2019, 11:39 AM IST