वाशिम - शहरात पोलीस ठाण्यापासून केवळ 200 मीटर अंतरावर 3 दुकाने फोडल्याची घटना घडली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळील कंकाळ कॉम्प्लेस्कमधील मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चोरी केली आहे.
वाशिममध्ये चोरट्यांचा धुडगुस; पोलीस ठाण्यापासून अवघ्या 200 मीटरवरील 3 दुकाने फोडली - खळबळ
दुकान फोडून चोरट्यांनी अंदाजे 15 ते 20 हजार रुपये चोरल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अक्षदा किडस रेडीमेड कपड्याचे दुकान आणि रौनक फर्निचर या 2 दुकानाचे शटर उघडण्यात चोरटे अयशस्वी ठरले. तर, बाजुच्या पतंजली शॉपीचे दुकान फोडून चोरट्यांनी अंदाजे 15 ते 20 हजार रुपये चोरल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यासोबतच रिसोड रोडवरील सुपर शॉपीचेही दुकान चोरांनी फोडल्याची घटना घडली आहे.
चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले आहेत. पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत. मात्र, शहरातील या धाडसी चोर्यांमुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.