वाशिम- स्वाभिमानी शेतकरी संघटना महाआघाडीमध्ये आहे. येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये ५० जागांवर लढण्याची तयारी आहे. त्यासंबंधी गुरुवारी महाआघाडीतील लहान-मोठ्या पक्षांची शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात बैठक आहे. यावेळी किती जागा पाहिजे? याबाबतची यादी काँग्रेस-राष्ट्रवादीला देणार असल्याचे शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीत ५० जागांवर लढण्याची तयारी - राजू शेट्टी राष्ट्रवादीची 5 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; धनंजय मुंडे परळीतून रिंगणात
वाशिम जिल्ह्यातील बंद असलेला बालाजी सहकारी साखर कारखाना सुरू व्हावा यासाठी केशवनगर येथे एल्गार मेळावा घेण्यात आला. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. महाआघाडीमध्ये अनेक लहान-मोठे पक्ष आहेत. कोणाला किती जागा पाहिजे? याबाबत निर्यण घेण्यात येणार आहे. बुधवारी मुंबईत होणाऱ्या बैठकीमध्ये डाव्या आघाडीचे नेते, शेतकरी संघटनेचे नेते आदी उपस्थित राहणार आहेत, असे राजू शेट्टी म्हणाले.
विधानसभा रणधुमाळी : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ९० टक्के जागा वाटपाचा सुटला तिढा