महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे नागरिक सुखावले; शेतकरी मात्र चिंतेत - rainfall washim

रविवारी जिल्ह्यात परतीच्या पावसाचे जोरदार आगमन झाले, ऑक्टोबर हिटमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे थोडा दिलासा मिळाला. मात्र, जिल्ह्यातील हंगामी पिकांना या पावसाचा फटका बसण्याची चिन्हे आहेत.

जिल्ह्यात परतीचा पावसाचे आगमन

By

Published : Oct 7, 2019, 9:56 AM IST

वाशिम -जिल्ह्यात रविवारी संध्याकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. या परतीच्या पावसामुळे 'ऑक्टोबर हिट'मुळे त्रासलेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र, या पावसामुळे जिल्ह्यातील हंगामी सोयाबीनच्या पिकाचे नुकसान होण्याची चिन्हे आहेत.

जिल्ह्यात परतीचा पावसाचे आगमन

सध्या जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनचा हंगाम जोरात सुरू असून शेतकरी सोयाबीन काढणीच्या कामात व्यग्र आहे. यातच, रविवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. तर, सोयाबीनची काढणी केलेल्या शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details