महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनामुळे कुंभार व्यावसायिक आर्थिक संकटात; संचारबंदीने माठ विक्री 'थंड'च - संचारबंदीने माठ विक्री थंड

वाशिम शहरात जागोजागी ही माठाची दुकाने थाटली आहेत. मात्र यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळं उन्हाळ्यात गरिबांचा फ्रिज म्हणून ओळख असलेल्या माठाच्या मागणीत घट आली. त्यामुळे जिल्ह्यातील कुंभार बांधवांवर आर्थिक संकट कोसळले आहे. जिल्ह्यातील गावागावात माठ विक्रीच्या व्यवसायात मंदीचे सावट पसरले आहे.

संचारबंदीने माठ विक्री 'थंड'च
संचारबंदीने माठ विक्री 'थंड'च

By

Published : Mar 18, 2021, 6:53 AM IST

Updated : Mar 18, 2021, 12:16 PM IST

वाशिम - उन्हाळ्याला सुरुवात झाली असून मागील काही दिवसात वाशिम जिल्ह्यात तापमानात वाढ झाली आहे. या काळात थंड पाण्याने तहान भागवण्यासाठी गरिबांचा फ्रिज म्हणून ओळख असलेल्या माठाला दरवर्षी चांगलीच मागणी असते. यंदा मात्र माठ विक्रेत्या कुंभाराच्या आव्याकडे, दुकानाकडे नागरिकांचा ओघ तुरळक असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणजेच लॉकडाऊन, संचारबंदी याचा फटका या व्यवसायला बसल्याचे चित्र जिल्ह्यात बघण्यास मिळत आहे.

कोरोना आणि जलशुद्धीकरण केंद्राचा फटका?


जिल्ह्यात 150 हुन अधिक कुंभार बांधव पारंपरिक पद्धतीने मातीपासून माठ बनवितात. वाशिम शहरात जागोजागी ही माठाची दुकाने थाटली आहेत. मात्र यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळं उन्हाळ्यात गरिबांचा फ्रिज म्हणून ओळख असलेल्या माठाच्या मागणीत घट आली. त्यामुळे जिल्ह्यातील कुंभार बांधवांवर आर्थिक संकट कोसळले आहे. गावागावात माठ विक्रीच्या व्यवसायात मंदीचे सावट पसरले आहे. आज घडीला कमी खर्चात सहजरित्या शुद्ध पाणी मिळत आहे, शिवाय ते थंड करण्यासाठी घरातील फ्रिजचा मार्ग मोकळा असल्याने माठाचे अस्तित्वच धोक्यात आल्याचे दिसून येते.

कुंभार व्यावसायिक आर्थिक संकटात


शहरातील कुंभार गल्लीत पिढ्यांपिढ्या पारंपरिक पद्धतीने फिरत्या चाकावर माठ तयार केले जातात. हे माठ बाजारात विक्रीसाठी आणले जातात. मात्र मागील वर्षापासून माठाच्या मागणीत घट होत असल्याचे दिसून येत आहे. दिवसाला केवळ पाच ते दहा माठांची विक्री होत असल्याचे येथील व्यावसायिक सांगत आहेत.

सध्या विविध इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या सवलतीच्या दरात फ्रिज तसेच संबंधित इलेक्ट्रॉनिक वस्तू उपलब्ध करून देत असल्याने व बाजारात कोरोनाची भीतीने नागरिकांचा कल या आधुनिक वस्तूंकडे अधिक वाढत आहे. शिवाय ऐन उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई आणि दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रातून मिळणाऱ्या पाण्याच्या मागणीत वाढ होत असल्याने माठांच्या मागणीत घट झाली आहे. परिणामी जिल्ह्यातील कुंभार बांधवांचा व्यवसाय आर्थिक तोट्यात आला आहे.

5 वाजले की बंद होतो व्यवसाय...

या आधी आम्ही रात्री 8 वाजेपर्यंत माठ विकायचो, मात्र कोरोनामुळे वाशिम जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव बघता जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात सायंकाळी पाच वाजता पासून दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे सायंकाळी पाच वाजता जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद होत आहेत. पोलीस प्रशासनाच्या वतीने 5 वाजल्यानंतर दुकानदाराला सांगण्यात येते की दुकाने बंद करा, तसेच नागरिकांनाही घराबाहेर पडता येत नाही. त्याचाही परिणाम विक्रीवर होत असल्याचे कुंभार व्यावसायिकांनी सांगितले.


Last Updated : Mar 18, 2021, 12:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details