महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूर-औरंगाबाद महामार्गावर पोलीस व्हॅनला पिकअपची धडक, चार जण गंभीर जखमी - वाशीम

एम. एच. २९ एम ९०९४ क्रमांकाची पोलिस व्हॅन पुण्यावरून यवतमाळकडे निवडणुकीचे सामान घेऊन जात असतांना, समोरून येणाऱ्या एम. एच. १६ सी. सी. ७५५१ क्रमांकाच्या बोलेरो पिकअपने या व्हॅनला समोरून जबरदस्त धडक दिली. या  घटनेत ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.

नागपूर-औरंगाबाद महामार्गावर पोलीस व्हॅनला पिकअपची धडक, चार जण गंभीर जखमी

By

Published : Mar 28, 2019, 8:11 PM IST

वाशीम -नागपूर-औरंगाबाद द्रुतगती महामार्गावर असलेल्या कोळी फाट्याजवळ पोलीस व्हॅनला बोलेरो पिक अपने धडक दिली. या अपघातात ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

नागपूर-औरंगाबाद महामार्गावर पोलीस व्हॅनला पिकअपची धडक, चार जण गंभीर जखमी

मिळालेल्या माहितीनुसार एम. एच. २९ एम ९०९४ क्रमांकाची पोलिस व्हॅन पुण्यावरून यवतमाळकडे निवडणुकीचे सामान घेऊन जात असतांना, समोरून येणाऱ्या एम. एच. १६ सी. सी. ७५५१ क्रमांकाच्या बोलेरो पिकअपने या व्हॅनला समोरून जबरदस्त धडक दिली. या घटनेत ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये बोलेरो पिक अपमधील इफ्तेखार सलीम बागवान (वय २५ वर्ष) व फारूखभाई (दोघेही रा. अकोला) तर पोलिस व्हॅनमधील पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर गणपतरव खंडारे (वय ५५ वर्ष ) व मंगेश येरखडे (वय ४० वर्ष) यांचा समावेश आहे. जखमींना प्राथमिक उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार बोलेरो पिक अप चालक फारूखभाई यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले आहे. दरम्यान, कारंजा ग्रामीण पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details