महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मालेगाव पोलीस ठाण्यातील एपीआयसह तीन पोलीस कर्मचारी होम क्वारंटाईन

दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या मेडशी येथील वृद्धाची कोरोना पॉझिटिव्ह निघाली आहे. त्या वृद्धाच्या मुलाच्या संपर्कात आलेल्या मालेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत मेडशी पोलीस चौकीतील एक सहाय्यक पोलीस निरीक्षक व तीन पोलीस कर्मचारी यांना खबरदारीचा उपाय म्हणून होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

malegao washim district
मालेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षकासह तीन पोलीस कर्मचारी होम क्वारंटाईन

By

Published : Apr 5, 2020, 3:14 PM IST

Updated : Apr 5, 2020, 4:41 PM IST

वाशिम- दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या मेडशी येथील वृद्धाची कोरोना पॉझिटिव्ह निघाली आहे. त्या वृद्धाच्या मुलाच्या संपर्कात आलेल्या मालेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत मेडशी पोलीस चौकीतील एक सहाय्यक पोलीस निरीक्षक व तीन पोलीस कर्मचारी यांना खबरदारीचा उपाय म्हणून होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

मालेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षकासह तीन पोलीस कर्मचारी होम क्वारंटाईन
दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी होवून मेडशी येथे आलेल्या वृद्धाचे आरोग्य विभागाने विलगीकरण करून घशातील लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यानंतर गावात माझ्या वडिलांना कोरोना झाल्याची अफवा पसरविण्यात येत आहे, संबंधितांवर कारवाईच्या मागणीसाठी त्या वृद्धाचा मुलगा मालेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत मेडशी पोलीस चौकी येथे गेला होता. त्याने तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करून तक्रार दिली. त्यानंतर त्या वृद्धाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह निघाला. त्या वृद्धाच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना आरोग्य विभागाने ताब्यात घेऊन विलगीकरण करून त्यांच्या घशातील लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठवले. त्यामुळे त्या मुलाच्या संपर्कात आलेले एक सहाय्यक पोलीस निरीक्षक व तीन पोलीस कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले. या घटनेमुळे मालेगाव पोलिसांसोबतच कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
Last Updated : Apr 5, 2020, 4:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details