वाशिम- आईने आपल्या दोन चिमुकल्यांसह स्वतः आत्महत्या केल्याची घटना जिल्ह्यातील तोंडगाव इथे घडली. या घटनेमुळे प्रत्येकाचे मन सुन्न झाले आहे. जयश्री गजानन गवारे (वय 28), गणेश गजानन गवारे (वय 05) आणि मोहित गजानन गवारे (वय 03) अशी मृतांची नावे आहेत. आत्महत्येमागचे नेमके कारण अजून समोर आलेले नाही. मात्र, तपासात पोलिसांच्या हाती सुसाईड नोट आली असल्याने त्याआधारे वाशिम ग्रामीण पोलीस तपास करत आहेत.
वाशिम तालुक्यातील तोंडगाव हे जयश्री यांचे माहेर आहे. जयश्री यांचा विवाह तालुक्यातील जांभरुण नावजी या गावातील गजानन गवारे यांच्यासोबत झाला होता. काही वर्षांच्या सुखी संसारानंतर त्यांना दोन अपत्ये झाली. त्यानंतर पती-पत्नीमधील वाद पोलिसांच्या उंबऱ्यावर पोहोचला होता. त्यामुळे जयश्री मागील काही महिन्यांपासून मुलांसह माहेरी तोंडगाव येथे वास्तव्यास होती.