वाशिम - अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी मोदी सरकार -२ चा पहिला अर्थसंकल्प जाहीर केला. यामध्ये त्यांनी उत्पादन शुल्क वाढल्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार असल्याची माहिती दिली होती. त्याप्रमाणे आजपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. शुक्रवारी वाशिम जिल्ह्यात पेट्रोलचा दर हा 76.54 रुपये होता. जो आज 79.9 रुपये प्रति लिटर झाला आहे. त्याचप्रमाणे शुक्रवारी डिझेलचा दर 66.74 रुपये होता. तो आज 69.34 रुपये झाला आहे.
इंधन दरवाढ: वाशिम जिल्ह्यात पेट्रोल 79.9 तर डिझेल 69.34
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी मोदी सरकार - २ चा पहिला अर्थसंकल्प जाहीर केला. यामध्ये त्यांनी उत्पादन शुल्क वाढल्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार असल्याची माहिती दिली होती. त्याप्रमाणे आजपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.
वाशिम जिल्ह्यात पेट्रोल 79.9 तर डिझेल 69.34
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या दरवाढीवर शासनाने विचार करायला हवा. या दरवाढीचा परिणाम सर्वसामान्यांवर होणार असल्याचे ग्राहकांनी सांगितले. सरकार शेतकऱ्यांच्या शेतमालाचे दर वाढत नाही मात्र, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवत असल्याचे म्हणत अनेक नागरिकांनी सरकारवर निशाणा साधला.