वाशिम- सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. हा पादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्वोतपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासला गेला आहे.
जिल्हा बँकेत नागरिकांची गर्दी... सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा - कोरोना बातमी
जिल्ह्यातील एकमेव कोरोनाबाधित रुग्णाला नुकतेच यशस्वी उपचार करुन घरी सोडण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेने लगेच सुटकेचा निश्वास टाकत लॉकडाऊनच्या नियमाचे उल्लंघन सुरू केल्याचा प्रकार आज मंगरुळपीर येथील जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेत पाहायला मिळाला.
जिल्ह्यातील एकमेव कोरोनाबाधित रुग्णाला नुकतेच यशस्वी उपचार करुन घरी सोडण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेने लगेच सुटकेचा निश्वास टाकत लॉकडाऊनच्या नियमाचे उल्लंघन सुरू केल्याचा प्रकार आज मंगरुळपीर येथील जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेत पाहायला मिळाला. लॉकडाऊन शिथील झाला असा गैरसमज करत बँकेत गर्दी केली. त्यामुळे सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडाला. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाकडून लॉकडाऊनचे नियम पूर्वी प्रमाणेच लागू राहतील असे सूचित केले होते. तरी देखील नागरिकांनी ती सूचना गांभीर्याने घेतली नसल्याचे दिसून आले.