वाशिम - जिल्ह्यातील रिसोड, मालेगाव, मंगरुळपीर आणि वाशिम तालुक्यांत अनेक ठिकाणी आज मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे कोठारी परिसरातील नाल्याला पूर आला. त्यामध्ये काही गुरे वाहून गेली. मात्र, त्यांना वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले.
वाशिममध्ये मुसळधार पाऊस, नाल्यामध्ये वाहून गेलेल्या गुरांना वाचविण्यात यश - वाशिम पाऊस बातमी
महाराष्ट्रात कालच मान्सून दाखल झाला. त्यामुळे बुधवारी रात्रीपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. तसेच मान्सूनचा पाऊस खरीप हंगामासाठी पोषक असल्याने जिल्ह्यातील शेतकरी सुखावला आहे. तसेच आता पेरणीच्या कामाला देखील वेग येणार आहे.
वाशिममध्ये मुसळधार पाऊस, नाल्यामध्ये वाहून गेलेल्या गुरांना वाचविण्यात यश
महाराष्ट्रात कालच मान्सून दाखल झाला. त्यामुळे बुधवारी रात्रीपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. कोठारी परिसरातील नाल्याला देखील पूर आला आहे. यावेळी शेतकरी गुरांना घेऊन पूल ओलांडत असताना गुरे नाल्यामध्ये वाहून गेले. मात्र, त्यांना वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले. मान्सूनचा पाऊस खरीप हंगामासाठी पोषक असल्याने जिल्ह्यातील शेतकरी सुखावला आहे. तसेच आता पेरणीच्या कामाला देखील वेग येणार आहे.