वाशिम - रॅगिंगचा बळी ठरलेल्या डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी अखिल भारतीय सत्यशोधक समाज वाशिम जिल्हा व इतर संघटनांतर्फे आज वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या प्रकरणाचा फास्ट ट्रॅक कोर्ट च्या माध्यमातून तात्काळ निकाल लावावा, तिन्ही डॉक्टरांची वैद्यकीय MBBS पदवी रद्द करावी यासह विविध मागण्या करण्यात आल्या.
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी दोषी डॉक्टरांची MBBS पदवी रद्द करा - पायल तडवी
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी अखिल भारतीय सत्यशोधक समाज वाशिम जिल्हा व इतर संघटनांतर्फे आज वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी जमलेले अखिल भारतीय सत्यशोधक समाज संघटना, जिल्हा वाशिम व इतर संघटनेचे कार्यकर्ते
डॉ. पायल तडवी या मूळच्या जळगावच्या असून त्यांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा विविध संघटनांकडून निषेध करण्यात येत असून यात आज वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी जिल्हा प्रशासनामार्फत मा राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले. या वेळी विविध पदाधिकारी उपस्थित होते.