वाशिम - अमरावती महामार्गावरील सुपखेला फाटा जवळ रात्री १२.३० वाजताच्या दरम्यान कार व ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात कार मधील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अनिल तोताराम बजाज (रा. आयुडीपी कॉलनी, वय ५८ वर्ष) असे मृताचे नाव आहे.
वाशिमच्या सुपखेला फाट्याजवळ ट्रक व कारचा भीषण अपघात; एकजण ठार - वाशिम अपघात
अमरावती महामार्गावरील सुपखेला फाटा जवळ रात्री १२.३० वाजताच्या दरम्यान कार व ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात कार मधील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अनिल तोताराम बजाज (रा. आयुडीपी कॉलनी, वय ५८ वर्ष) असे मृताचे नाव आहे.
सुपखेला फाट्या जवळ ट्रक व कारचा भीषण अपघात ; एकजण ठार
वाशिम येथील रहिवासी असलेले अनिल बजाज हे अमरावती येथून कारने वाशिमकडे येत होते. दरम्यान, वाशिमपासून जवळच असलेल्या सुपखेला जवळ ट्रक व कारची धडक झाली. या अपघातात बजाज यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.