वाशिम - जिल्ह्यातील शिरपूर जैन. नजीकच्या हिवरापेन येथे जुन्या वादावरून पुतण्याने काकाच्या अंगावर गाडी घालून व दगडाने ठेचून खून केल्याची घटना आज ७ जूनला सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. साहेबराव गुलाबराव सरनाईक (वय ४५) असे काकांचे तर योगेश गणपतराव सरनाईक असे या पुतण्याचे नाव आहे. या प्रकरणी आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.
वाशिममध्ये जुन्या वादातून काकाचा दगडाने ठेचून खून, पुतण्यास अटक
रविवार ७ जुनच्या सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान योगेशचे काका साहेबराव सायकलने शेतात जात होते. यावेळी पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीच्या परिसरात त्यास पुतण्याने (एम एच १२ ए एफ ४६८) या क्रमांकाचा गाडीने त्यांना धडक दिली. त्यानंतर एवढ्यावरच न थांबता डोक्यात दगड घातले. यामध्ये काका साहेबराव सरनाईक हे जागेवरच ठार झाले.
या घटनेची मिळालेली माहिती अशी, की शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या रिसोड तालुक्यातील हिवरापेन येथे मृत साहेबराव सरनाईक व त्याचा पुतण्या योगेश सरनाईक यांच्यात जुना वाद होता. आज रविवार ७ जुनच्या सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान योगेशचे काका साहेबराव सायकलने शेतात जात होते. यावेळी पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीच्या परिसरात त्यास पुतण्याने (एम एच १२ ए एफ ४६८) या क्रमांकाचा गाडीने त्यांना धडक दिली. त्यानंतर एवढ्यावरच न थांबता डोक्यात दगड घातले. यामध्ये काका साहेबराव सरनाईक हे जागेवरच ठार झाले. या घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार समाधान वाठोरे पोलीस उपनिरीक्षक शरद साठे, बीट जमादार विनोद चव्हाण, महादेव चव्हाण, विनोद जायभाये, रमेश मोरे यांनी घटनास्थळावर जाऊन आरोपी योगेश सरनाईक यास अटक केली.
घटनास्थळाला अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय चव्हाण यांनी भेट दिली. याप्रकरणी मृताची पत्नी अनिता साहेबराव सरनाईक यांनी शिरपूर पोलीस स्टेशमध्ये दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.