महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बंद रुग्णालयाला हार घालत वाशिममध्ये महिलांचे अनोखे आंदोलन - inogration

गोर-गरीब महिलांना वाशिम जिल्ह्यातच चांगली आरोग्य सेवा मिळावी, यासाठी सरकारकडून १०० खाटांचे उत्तम प्रतिचे रुग्णालय बांधण्यात आले. रुग्णालय बांधून तयार आहे.

वाशिम

By

Published : Mar 8, 2019, 7:37 PM IST

वाशिम - सरकारने कोट्यवधी रुपये खर्च करून १०० खाटांचे महिला रुग्णालय बांधून तयार केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तब्येत बिघडल्यामुळे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते १४ फेब्रुवारीला रुग्णालयाचे लोकार्पण झाले. मात्र, अजूनही रुग्णालय सुरू न झाल्याने महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी या रुग्णालयाच्या बंद दरवाज्याला हारार्पण करत नारळ फोडून अनोखे आंदोलन केले. यावेळी सरकार विरोधात घोषणा देत निषेध करण्यात आला.

वाशिम

गोर-गरीब महिलांना वाशिम जिल्ह्यातच चांगली आरोग्य सेवा मिळावी, यासाठी सरकारकडून १०० खाटांचे उत्तम प्रतिचे रुग्णालय बांधण्यात आले. रुग्णालय बांधून तयार आहे, मात्र येथे कर्मचाऱ्यांचा स्टाफ नसल्याचे कारण दाखवत हे रुग्णालय अद्याप सुरू झाले नाही. त्यामुळे आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन केले. एका महिन्यांच्या आत रुग्णालय सुरू झाले नाही तर, तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी महिलांनी दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details