वाशिम - राज्यात सध्या भीषण पाणीटंचाई आहे. नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. मुक्या प्राण्यांची अवस्था खुपच बिकट आहे. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील अंधारसावंगी येथील मुक्या प्राण्यांसाठी मुकुंदराव नप्ते यांनी या गावातील हातपंपावरून पाणवठे तयार केले आहेत. नप्ते हे गेल्या अनेक वर्षापासून विशेष करून माकडांच्या पाण्यासाठी होत असलेली भटकंती थांबविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
पाच वर्षापासून माकडे व अन्य मुक्या जनावरांची सेवा करणारे मुकुंदराव नप्ते महाराज - animals
या घाटाच्या पायथ्याशी वन विभागाने गेल्या पाच-सात वर्षांपूर्वी हातपंप सुरू केली होती, पण त्या पाणी भरण्यासाठी कोणालाच वेळ नव्हता.
अंधारसावंगी हे गाव घनदाट वसलेले आहे. या जंगलातून जाण्यासाठी एक मोठा घाट आहे. पाण्यासाठी वन्यप्राण्यांची होत असलेली भटकंती पाहता गेल्या पाच वर्षांपासून मुकुंदराव नप्ते यांनी हात पंपावरून पानवठे तयार करून माकडांसाठी खाण्यासाठी व्यवस्था करून वन्य प्राण्यांची पाण्यासाठी होत असलेली भटकंती थांबविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या घाटाच्या पायथ्याशी वन विभागाने गेल्या पाच-सात वर्षांपूर्वी हातपंप सुरू केली होती, पण त्या पाणी भरण्यासाठी कोणालाच वेळ नव्हता. त्यामुळे जंगलातील हरीण, कोल्हे, बिबट्या, माकड, मोर, लांडगे या प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. मुकुंदराव यांनी येथील वन्यप्राण्यांची होणारी भटकंती पाहता गेल्या पाच वर्षापासून येथील हात पंपावरून दररोज सकाळी जंगलात जाऊन पाणवठे भरतात आणि माकडांसाठी खाण्याची व्यवस्था करतात.