वाशिम -शहरातील सायकलपटू नारायण व्यास यांनी वाशिम ते रामसेतू ही सायकल यात्रा सुप्रसिद्ध सिनेअभिनेता सोनू सूद याला समर्पित केली आहे. सोनू सूद याने लॉकडाऊन काळात शहरात अडकलेल्या हजारो कुटुंबाना मदत केली होती. त्याच्या कार्याने प्रेरित होवून व्यास हे भारताच्या दक्षिण टोकाकडील शेवटचा भूभाग असलेल्या रामसेतू येथे जाण्यासाठी निघाले असून, 5 राज्यातून ही सायकल यात्रा जाणार आहे.
माहिती देताना सायकलपटू नारायण व्यास हेही वाचा -तर प्रत्येक पेट्रोल पंपावरील मोदींच्या बॅनरसमोर आंदोलन करू - रुपाली चाकणकर
व्यास यांची सायकल यात्रा तब्बल 2 हजार किलोमिटरची असणार आहे. यावर सोनू सूद याने नारायण व्यास यांना ट्विटरवरून शुभेच्छा देऊन त्यांचे कौतुक केले व हे आपले सर्वात मोठे यश असल्याचे सांगितले. नारायण व्यास हे पहिल्या दिवसाच्या राईडमध्ये 250 किमी सायकलींग पूर्ण करणार असून त्यांचा पहिला मुक्काम तेलंगणा राज्यातील निजामाबाद येथे असणार आहे. विशेष म्हणजे, वाशिम ते रामसेतू ही जी सायकल यात्रा आहे, ती ७ दिवसामध्ये पार करणार असल्याचे व्यास यांनी सांगितले.
हेही वाचा -जिल्ह्यातील 12 ग्रामपंचायतीत सरपंच पदाच्या आरक्षणानुसार उमेदवारच नाही