वाशिम -आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर किलीमांजारोच्या गिलमन्स पॉईंटवर भारताचा तिरंगा फडकवून जिल्ह्यातील पिता-पित्रांनी इतिहास रचला आहे. आरव मंत्री आणि शिवलाल मंत्री पेडगाव (रा. पेडगाव, ता. रिसोड, जि. वाशिम) असे या पिता पुत्रांचे नाव आहे. महाराष्ट्रातील यशस्वी ऍडव्हेंचर कंपनी 360 एक्सप्लोरर मार्फत आफ्रिकेतील सर्वोच्च शिखरावरील ही मोहिम आयोजीत करण्यात आली होती.
किलीमांजारो हे आफ्रिकेतील टांझानिया देशातील शिखर असून याची उंची समुद्र सपाटी पासून 19,341 फूट एवढी आहे. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी 15 ऑगस्ट 2014 ला हे शिखर सर करून त्यावर भारताचे राष्ट्रगीत वाजवून विश्वविक्रम केला होता. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत असलेल्या गिर्यारोहक आरव मंत्री आणि त्याचे वडील शिवलाल मंत्री यांनी हे शिखर सर केले आहे.