दुचाकी महामार्गावर उभ्या टँकरवर आदळली.. दुचाकीस्वार जागीच ठार - वाशिम अपघात
नागपूर-औरंगाबाद महामार्गावर धानोरा ताथोड गावानजीक उभ्या टँकरला दुचाकी धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला.
वाशिम - जिल्ह्यातील नागपूर-औरंगाबाद महामार्गावर धानोरा ताथोड गावानजीक उभ्या टँकरला दुचाकी धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. अमोल पाथोडे (वय 26) असे मृताचे नाव आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील वालखेड येथील अमोल पाथोडे आपल्या दुचाकी (क्र. MH 29 AS 6140) ने वालखेड येथून कारंजाच्या दिशेने जात होते. धानोरा ताथोड गावानजीक महामार्गावर उभ्या असलेल्या टँकरवर त्यांची दुचाकी जाऊन आदळली. या भीषण अपघात दुचकीस्वार अमोल पाथोडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर टँकर चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.