वाशिम - जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर कोरोनामुळे पूर्वीच आर्थिक संकट ओढवले आहे. त्यातच रविवार कारंजा तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांसह भाजीपाला पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.
कारंजा तालुक्यात अवकाळी पाऊस, रब्बी पिकांसह भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान
राज्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर कोरोना सावट असताना त्यात अवकाळी पावसाची भर पडल्याने कापणीवर आलेल्या रब्बी पिकांचे तसेच भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांना परतीच्या अवकाळी पावसाने खरीप पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते. यातून सावरण्यासाठी रब्बी पिकांवर अवलंबून असताना कोरोनामुळे त्यांच्या रोजगारावर संकट आले आहे. त्यातच आता मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने पिकाचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात आला आहे. त्यामुळं आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यावर अवकाळीच पुन्हा-पुन्हा संकट आल्याने जिल्हा प्रशासनाने नुकसान ग्रस्त भागाचे पंचनामे करून भरीव मदत करावी, अशी मागणी केली जात आहे.