वाशिम - मंगरुळपीर तालुक्यातून विविध ठिकाणाहुन दुचाकीची चोरी करणाऱ्या तीन चोरट्यांना मंगळुरूपीर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरीच्या ४ मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. विक्की खाडे, सुमेध खाडे, गोलू ऊर्फ महादेव खाडे असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
मंगरूळपीर पोलिसांनी तीन चोरट्यांना केले गजाआड; चोरट्यांकडून चार मोटारसायकली जप्त - Golu alias Mahadev Khade
सचिन बारड (रा. एडशी, ता . मंगरुळपीर) यांनी ११ जुलै रोजी मंगरुळपीर पोलिसात शेलूबाजार येथील शुभम शेळके यांच्या घरासमोरून दुचाकी वाहन चोरीला गेल्याची फिर्याद दाखल केली होती. त्याची दखल घेत मंगरूळपीर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली व चोरट्यांना शोधून काढले.
सचिन बारड (रा. एडशी, ता . मंगरुळपीर) यांनी ११ जुलै रोजी मंगरुळपीर पोलिसात शेलूबाजार येथील शुभम शेळके यांच्या घरासमोरून दुचाकी वाहन चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. त्याची दखल घेत मंगरूळपीर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी विक्की खाडे ( रा. बार्शीटाकळी ), सुमेध खाडे ( रा. खोपडी, ता . बार्शीटाकळी ) व गोलू ऊर्फ महादेव खाडे ( रा. बार्शीटाकळी ) या तीन आरोपींना अटक करून त्यांची सखोल चौकशी केली.
संबंधितांना पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर आरोपींनी चोरलेल्या चार मोटारसायकली पोलिसांच्या स्वाधीन केल्या. यामध्ये २ मोटार सायकली वाशिम पोलीस स्टेशनच्या हद्दीतील, तर २ मोटार सायकली मंगरुळपीर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आहेत.