वाशिम- राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यामुळे, राज्य आर्थिक अडचणीत आल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक मंडळी समोर येत आहे. जिल्ह्यातील एक अक्षरी नाव असलेले 'टो' येथील समाधी संजीवन श्री मैनागिरी महाराज या संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ८१ हजार १०० रुपयांचा मदत निधी देण्यात आला आहे. गावातील सर्व ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून ही रक्कम जमा केली असल्याची माहिती मिळाली आहे.
'टो' येथील श्री मैनागिरी संस्थेकडून मुख्यमंत्री सहायता निधीस मदत - mainagiri maharaj sanstha donation
वाशिम जिल्ह्यातील एक अक्षरी नाव असलेले 'टो' येथील समाधी संजीवन श्री. मैनागिरी महाराज या संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ८१ हजार १०० रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यावेळी गावातील सर्व ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून ही रक्कम जमा केली असल्याची माहिती मिळाली आहे.
मदत देताना ग्रामस्थ