महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अण्णाभाऊ साठेंच्या गीताचे विडंबन केल्याप्रकरणी आठवलेंनी माफी मागावी - मधुकर कांबळे - अण्णाभाऊ साठे स्मारक

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या गीताचे विडंबन केल्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांच्या या वक्तव्याचा अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष मधुकर कांबळे यांनी निषेध केला.

मधुकर कांबळे

By

Published : Aug 5, 2019, 9:22 AM IST

वाशीम - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या गीताचे विडंबन केल्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. या घटनेचा जाहीर निषेध करत अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष मधुकर कांबळे यांनी आठवले यांच्यावर निशाणा साधला.

मधुकर कांबळेंचा रामदास आठवलेंवर निशाणा

वाशिम येथे आयोजीत पत्रकार परिषदेत कांबळे बोलत होते. या वक्तव्याप्रकरणी रामदास आठवले यांनी समाजाची व देशवासीयांची माफी मागावी अशी मागणीही यावेळी कांबळे यांनी केली. ही एका केंद्रीय राज्यमंत्र्याला न शोभणारी भाषा असल्याचे कांबळे म्हणाले. एखाद्या सामान्य माणसाने चूक केले तर समजू शकतो, पण ज्यांच्याकडे सामाजिक न्याय विभागाचा कारभार आहे त्यांनीच असे वक्तव्य करणे म्हणजे निषेधार्ह असल्याचे कांबळे म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details