वाशिम- जिल्ह्यातील मालेगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, अशी मागणी करत शेकडो नागरिकांनी नागपूर-मुंबई महामार्गावरील किन्हीराजा येथे रास्तारोको आंदोलनाचे नियोजन केले होते. मात्र, या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने मध्यस्थी केली. त्यानंतर ग्रामस्थांनी हे आंदोलन मागे घेतले.
मालेगाव तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी; प्रशासनाच्या मध्यस्थीने नियोजित आंदोलन मागे
दुष्काळामुळे तालुक्यात प्रचंड पाणी आणि चारा टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे दुष्काळाने हतबल झालेल्या १० गावांतील सरपंचांनी एकत्र येऊन मालेगाव तालुका दुष्काळी जाहीर करण्याच्या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन करण्याचे ठरवले होते. मात्र, तहसीलदार यांनी मध्यस्थी केल्यामुळं त्यांचे नियोजित आंदोलन मागे घेण्यात आले.
गेल्यावर्षी झालेल्या अत्यल्प पर्जन्यमानामुळे संपूर्ण वाशिम जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. मात्र जिल्ह्यातील एकमेव रिसोड तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे मालेगाव तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या संकटाला सामोरे जात असतानाही त्यांना सरकारी मदतीपासून वंचित रहावे लागत आहेत. तसेच मालेगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी वेळोवेळी प्रशासनाला निवेदनेही देण्यात आली. मात्र, शासनाकडून त्याला दाद मिळाली नाही.
दुष्काळामुळे तालुक्यात प्रचंड पाणी आणि चारा टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे दुष्काळाने हतबल झालेल्या १० गावांतील सरपंचांनी एकत्र येऊन मालेगाव तालुका दुष्काळी जाहीर करण्याच्या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन करण्याचे ठरवले होते. मात्र, तहसीलदार यांनी मध्यस्थी केल्यामुळं त्यांचे नियोजित आंदोलन मागे घेण्यात आले. तसेच प्रशासनाने दिलेल्या आश्वासानानुसार लवकरात लवकर दुष्काळ जाहीर केला नाही, तर यापुढे उग्र आंदोलन करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला.