वाशिम -मंगरुळपीर तालुक्यातील आसेगावात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आल्यानंतरही खबरदारी म्हणून गावातील प्रतिबंधित क्षेत्र २२ दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.
19 जुलैला एका खासगी डॉक्टरचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर प्रशासनाने अर्लट होत गावात घरोघरी जाऊन ग्रामस्थांची तपासणी सुरू केली. त्यानंतरही गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण गाव कंटेन्मेंट झोन जाहीर करून संचारबंदी लागू करण्यात आली. कामकाजच बंद असल्याने किराणामाल विकत घेण्यासाठी देखील मजूरांच्या कुटुंबांचे हाल झाले.
आसेगावात 22 दिवसांपासून प्रतिबंधित क्षेत्र कायम; कामगारांची उपासमार - washim corona news
मंगरुळपीर तालुक्यातील आसेगावात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आल्यानंतरही खबरदारी म्हणून गावातील प्रतिबंधित क्षेत्र २२ दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.
Breaking News
गावात प्रतिबंधित क्षेत्र असल्याने नागरिकांना कामासाठी बाहेर पडता येत नाहीय. त्यामुळे कामगारांसह मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतरही अद्याप खबरदारीसाठी सर्वत्र संचारबंदी कायम ठेवण्यात आलीय. त्यामुळे काही व्यवहारांसाठी प्रशासनाने शिथिलता द्यावी, अशी मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत.