वाशिम- दरवर्षी वाशिम जिल्ह्यातील लाखो वारकरी श्री क्षेत्र पंढरपूरला पायदळ दिंडी घेऊन विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात. वारकरी संप्रदाय व लोककलावंतांमुळेच आज देशामध्ये विविधतेत एकता दिसून येते. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे वारकरी संप्रदाय आणि लोककलावंताचे साहित्य संमेलन भरविण्यात आले. यामध्ये वारकरी तसेच लोककलावंतांनी सहभाग नोंदवला.
वाशिम जिल्ह्यात वारकरी आणि लोककलावंतांचे साहित्य संमेलन उत्साहात
वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे वारकरी संप्रदाय आणि लोककलावंतांचे साहित्य संमेलन भरविण्यात आले.
वारकरी साहित्य संमेलन
ऐतिहासिक नृसिंह स्वामी सरस्वतीच्या पावन नगरीत प्रथमच कामक्षा मंदिर सभागृहात श्री क्षेत्र पंढरपूर वारकरी व लोककलावंतांचे साहित्य संमेलन भरवण्यात आले. यावेळी दारुबंदी, व्यसनमुक्ती, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन अभियान कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी वारकऱ्यांचा नृसिंह सरस्वती आणि विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.