महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रहार संघटनेतर्फे आसेगाव येथे 'जेलभरो' आंदोलन - crop insurance

शेतकऱ्यांसह दिव्यांगांच्या विविध प्रलंबित समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

प्रहार संघटना

By

Published : Aug 1, 2019, 10:39 AM IST

वाशिम- शेतकऱ्यांसह दिव्यांगांच्या विविध प्रलंबित समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या वतीने वाशिम जिल्ह्यातील आसेगाव येथे बस थांब्यावर जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी पाच आंदोलकांना अटक करून सुटका केली आहे.

प्रहार संघटनेचे 'जेलभरो' आंदोलन

शेतकऱ्यांची कर्जमाफी, पीक विमा, दिव्यांग बांधव, शेतमजुरांच्या प्रलंबित समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या वतीने आसेगाव येथे जेलभरो आंदोलन करण्यात आले. यात प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भेंडेकर, सागर महल्ले, अतुल ठाकरे, शिवम ठाकरे आणि सचिन राठोड यांच्यासह इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details