वाशिम- कोरोनाविषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी आरोग्य अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने ही कार्यवाही करण्यात येत आहे. सद्यास्थितीत जिल्हा ग्रीन झोनमध्ये असला तरी शेजारील जिल्हे ‘रेड झोन’ मध्ये आहेत. त्यामुळे, जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
वाशिम जिल्ह्यातील सीमावर्ती भागात 'हायअलर्ट'; जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांची कडक तपासणी
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील सिमावर्ती भागात ‘हायअलर्ट’ जारी करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या सीमावर्ती गावातून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी प्रत्येक रस्त्यांवर पोलिसांचा खडा पहारा आहे.
पहारा देताना पोलीस
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील सीमावर्ती भागात ‘हायअलर्ट’ जारी करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या सीमावर्ती गावातून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी प्रत्येक रस्त्यांवर पोलिसांचा खडा पहारा आहे. जिल्ह्यातील वनोजा चेकपोस्टवर पर राज्यासह इतर जिल्ह्यातून येणाऱ्यांची प्रवेश करण्यापूर्वी आरोग्य अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जात आहे.