वाशिम - जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या 8 आरोग्य कर्मचाऱ्यांना तसेच कोविड काळात भरती केलेल्या 364 आरोग्य कर्मचाऱ्यांना शासनाने अचानक कामावरून काढून टाकल्याने या सर्वांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे या आरोग्य कर्मचाऱ्यांनी शासनाच्या या निर्णयाविरोधात वाशिम येथे निषेध मोर्चा काढला आहे.
कोविड काळात भरती केलेल्या 364 आरोग्य कर्मचाऱ्यांना कामावरून काढले; कर्मचाऱ्यांचा निषेध मोर्चा
जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या 8 आरोग्य कर्मचाऱ्यांना तसेच कोविड काळात भरती केलेल्या 364 आरोग्य कर्मचाऱ्यांना शासनाने अचानक कामावरून काढून टाकल्याने या सर्वांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे या आरोग्य कर्मचाऱ्यांनी शासनाच्या या निर्णयाविरोधात वाशिम येथे निषेध मोर्चा काढला आहे.
कर्मचाऱ्यांचा निषेध मोर्चा
यावेळी शासनाच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला असून जर येत्या एका आठवड्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेतले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला. त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी आणि आमदार अमित झनक यांना दिले आहे. कोविड काळात भरती केलेल्या 364 आरोग्य कर्मचाऱ्यांना शासनाने अचानक कामावरून काढून टाकल्याने वाशिममध्ये काढला.