वाशिम - जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील भर जहागीर येथील लोणार राज्य मार्गाला लागून असलेले एस. जी. जाधव कंपनीच्या व्हॉटमिक्स डांबर प्लँटला आग लागली आहे. या आगीत ज्ञानेश्वर उत्तम काळदाते हा 35 वर्षीय युवक भाजला असून सुमारे दोन तासानंतर न.प. रिसोडच्या अग्नीशमन दलाला आग विझविण्यात यश आले आहे.
व्हॉटमिक्स डांबर प्लँटला आग; एक जखमी, आग विझविण्यात यश - ज्ञानेश्वर उत्तम काळदाते
जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील भर जहागीर येथील लोणार राज्य मार्गाला लागून असलेले एस. जी. जाधव कंपनीच्या व्हॉटमिक्स डांबर प्लँटला आग लागली आहे. या आगीत ज्ञानेश्वर उत्तम काळदाते हा 35 वर्षीय युवक भाजला असून सुमारे दोन तासानंतर न.प. रिसोडच्या अग्नीशमन दलाला आग विझविण्यात यश आले आहे.
रिसोड-लोणार राज्य मार्गाला लागून अवघ्या दहा फुटावर एस.जी.जाधव कंपनीचा डांबर व्हॉटमिक्स प्लॅटसह स्टोनक्रेशर आहे. आज येथील एस.जी.जाधव कंपनी मधील व्हॉटमिक्स प्लँटला अचानक आग लागल्याने रिसोड ते लोणार मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या कंपनीतील आगीचा धूर सुमारे पंचवीस किलोमीटर पासून दिसत होता. सदर आगीतील व्हॉटमिक्स प्लँटला बंब फुटून दूरपर्यंत आग पोहचेल या भितीने कंपनीच्या अवघ्या वीस पंचवीस फुटावर राहणाऱया काही कुटुंबांनी जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळ काढला होता.
सदर घटनेमध्ये ज्ञानेश्वर उत्तम काळदाते (वय 35) हा युवक भाजला आहे. घटनेची माहिती काही युवकांनी रिसोड अग्नीशमन दलाला देताच दिड ते दोन तासाने आग विझविण्यात यश आले आहे.