महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जन्मदात्याचीच लेकीवर पडली वाईट नजर, पवित्र नात्याला फासला काळिमा - washim crime news

देशभर हैदराबाद बलात्कार व हत्या प्रकरण गाजत आहे. अशात वाशिममध्ये चक्क जन्मदात्या बापानेच आपल्या 15 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आले. पीडित मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

washim
आरोपी बाप

By

Published : Dec 12, 2019, 7:13 PM IST

Updated : Dec 12, 2019, 7:37 PM IST

वाशिम- देशभर हैदराबाद बलात्कार व हत्या प्रकरण गाजत आहे. अशात वाशिममध्ये चक्क जन्मदात्या बापानेच आपल्या 15 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आले. पीडित मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी बापाला अटक केली आहे.

पोटच्या अल्पवयीन मुलीवर नराधम बापानेच केला अत्याचार

हेही वाचा -बनावट सिमेंट विकणाऱ्या ७ जणांना अटक; शहर पोलिसांची कारवाई

वाशिममध्ये वास्तव्यास असलेल्या एका नराधम बाप अनेक दिवसापासून आपल्या अल्पवयीन मुलीवर सतत अत्याचार करत असल्याचे समोर आले. पीडित मुलीने अत्याचार होत असल्याची माहिती आपल्या आईला सांगितली. त्यानंतर आईने ११ डिसेंबरला रात्री उशिरा वाशिम शहर पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी नराधम बापावर विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करत आरोपी बापाला अटक केली आहे. पुढील तपास वाशिम शहर पोलीस करत आहेत.

Last Updated : Dec 12, 2019, 7:37 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details