महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Washim Girl Child Buried : एक वर्षाच्या चिमुकलीला बापानेच जिवंत पुरले, वाशिमच्या रिसोड तालुक्यातील घटना - वाशिम मुलीला जिवंत गाडले

एका निर्दयी बापाने आपल्या एका वर्षाच्या चिमुकलीला ( Father Buried His 1 year Old Child ) जिवंत खड्ड्यात पुरल्याची घटना काल संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान उघडकीस आली. या घटनेत चिमुकलीचा मृत्यू झाला.

Washim Girl Child Buried
Washim Girl Child Buried

By

Published : Mar 12, 2022, 11:21 AM IST

वाशिम -एका निर्दयी बापाने आपल्या एका वर्षाच्या चिमुकलीला ( Father Buried His 1 year Old Child ) जिवंत खड्ड्यात पुरल्याची घटना काल संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान उघडकीस आली. या घटनेत चिमुकलीचा मृत्यू झाला. सुरेश घुगे (27) वर्षीय निर्दयी पित्याचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

भांडणातून केले कृत्य -

रिसोड तालुक्यातील वाडीवाकद येथील सुरेश घुगे हा आपल्या पत्नी कावेरी सोबत शेतातील गोठ्यावर राहत होता. दोघा पती-पत्नींना तीन मुली असून, सुरेश हा नेहमी कावेरीच्या चरित्रावर संशय घ्यायचा. यातून दोघांची नेहमी भांडणे व्हायची. सुरेशला दारूचे व्यसन असल्याने, काल दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात सुरेशने आपल्या पत्नीला बेदम मारहाण केली. कावेरी आपला जीव वाचवण्यासाठी गावाकडे जाऊन सासरकडील दिराला हकीकत सांगितली. गावातील नागरिक शेताकडे गेले असता चिमुकली दिसत नसल्याने त्यांनी सुरेशला विचारणा केली. त्याने मुलीली जिवंत गाडले असल्याचे स्वतः सांगितले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार देवेंद्रसिंह ठाकूर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. तसेच आरोपी बापाला अटक केली.

हेही वाचा -Nagpur Double Murder Case : पत्नी आणि मुलीची हत्या केल्यानंतर 'त्याने' केली आत्महत्या, हिंगणा एमआयडीसीतील घटना

ABOUT THE AUTHOR

...view details