महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाचा फटका; बाजारपेठ मिळत नसल्याने टोमॅटो पिकात सोडली जनावरे - संचारबंदी

देशात कोरोनाने हाहाकार उडाल्याने दर कोलमडून बाजारपेठ मिळली नाही. त्यामुळे शेतकऱ्याने टोमॅटो पिकात जनावरे सोडली.

farm
शेतात सोडलेली जनावरे

By

Published : Apr 26, 2020, 1:49 PM IST

वाशिम- संचारबंदीमुळे टोमॅटोला बाजारपेठ मिळत नसल्याने शेतकऱ्याने टोमॅटो पिकात जनावरे सोडली. ही घटना किनखेडा येथे घडली असून आतीष अवचार असे शेतात जनावरे सोडणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

कोरोनाचा फटका; बाजारपेठ मिळत नसल्याने टोमॅटो पिकात सोडली जनावरे

आतीष यांनी यंदा रब्बीत एक एकर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड केली. मात्र ऐन टोमॅटो विक्रीसाठी आले असता, देशात कोरोनाने हाहाकार उडाला. त्यामुळे दर कोलमडून बाजारपेठ मिळली नाही.

कोरोनाच्या या फटक्याने आतिष यांचे दोन लाखांचे उत्पन्न अपेक्षित असलेल्या शेतात लागवड खर्च वसूल झाली. त्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्याने शेवटी विक्रीला आलेल्या टोमॅटो पिकात जनावरे सोडली आहेत. त्यामुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details