वाशिम - कर्जबाजारीपणाला कंटाळून जिल्ह्यातील धनज येथील शेतकऱ्यानी आत्महत्या केली आहे. तीस हजाराच्या कर्जापोटी शेतकऱ्यानी हे पाऊल उचल्याची माहिती आहे.
मागील तीन वर्षांपासून असेलेली सततची नापिकी आणि मागच्या वर्षी झालेले कमी प्रजन्यमानामुळं पीक हातचं गेले. यामुळे हताश होऊन कारंजा तालुक्यातील धनज येथील नारायण बिलेवार या ७० वर्षीय शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली.
वाशिममध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या; तीस हजारांच्या कर्जापायी उचलले पाऊल - वाशिम
मागील तीन वर्षांपासून असलेली सततची नापिकी आणि मागच्या वर्षी झालेले कमी पर्जन्यमानामुळे पीक हातचे गेले. यामुळे हताश होऊन नारायण बिलेवार या ७० वर्षीय शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात गळफास लावून आत्महत्या केली.
शेतकरी आत्महत्या
नारायण बिलेवार हे दोन एकर कोरडवाहू शेतजमिनीचे मालक होते. बँकेचे ३० हजार रुपयांचे कर्ज थकीत असल्याने ते फेडायचे कसे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.