वाशिम- जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून सतत दुष्काळी परिस्थिती असून फळबागा करपत आहेत. मालेगाव तालुक्यातील विशाल राऊत हे टँकरने पाणी विकत घेऊन संत्रा बाग जगवत आहेत. त्यामुळे त्यांना बाग जगविण्यासाठी सात लाख रुपये खर्च येणार आहे. फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी भरीव मदत द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
दुष्काळात संत्रा बागेला टँकरने पाणी देण्याची वेळ; शेतकरी अडचणीत - Tanker
जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून सतत दुष्काळी परिस्थिती असून फळबागा करपत आहेत. मालेगाव तालुक्यातील विशाल राऊत हे टँकरने पाणी विकत घेऊन संत्रा बाग जगवत आहेत. त्यामुळे त्यांना बाग जगविण्यासाठी सात लाख रुपये खर्च येणार आहे.
संत्रा बागेला टँकरने पाणी देताना शेतकरी
मालेगाव तालुक्यातील मुंगळा येथील विशाल राऊत यांनी १० वर्षांपूर्वी १५ एकरांवर संत्रा बागेची लागवड केली आहे. मात्र, गेल्या तीन वर्षात कमी पर्जन्य मानामुळे दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे अनेक फळबागा करपत आहेत. फळबाग जगविण्यासाठी राऊत यांनी टँकर लावले असून एका टँकरचे पाणी दहा झाडांना पुरत असल्याने एक झाडाला १५० रुपये खर्च येत आहे.